📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जामखेडमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चेन स्नॅचिंगची घटना;१८ ग्रॅम सोन्याचे गंठण हिसकावले

जामखेडमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चेन स्नॅचिंगची घटना;१८ ग्रॅम सोन्याचे गंठण हिसकावले

जामखेड प्रतिनिधी :
जामखेड शहरातील सदाफुले वस्ति भागात शाईन कंपनीच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी स्कुटीवरून चाललेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण खेचून पळ काढला. दरम्यान घटनेमुळे सदर महिलेसह सदाफुले वस्ति येथील महिला भयभीत झाल्या असून सदाफुले वस्ति येथील सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष वसीमभाई सय्यद, उमर कुरेशी, राजेंद्र सदाफुले, नासिर सय्यद, अनिल सानप व पक्ष पदाधिकारी शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तत्काळ तपास करावा व आरोपीस अटक करावी अशी मागणी केली तसेच लवकरात लवकर तपास न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

तर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तपास प्रकरणी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला दिले. सदर महिलेने आपल्या स्कुटीवरून पाठलागही केला, युवक मात्र चोरटे भरधाव वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे सदर महिलेसह सदाफुले वस्तिवरील महिला भयभीत झाल्या असून सदाफुले वस्ति येथील सामाजिक कार्यकर्ते व पक्ष पदाधिकारी यांनी शिष्टमंडळासह पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास करावा तसेच आरोपीस अटक करावी अशी मागणी केली. तसेच लवकरात लवकर तपास न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

या प्रकरणी पीडित महिला पल्लवी अनिल सानप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे माझी भाची वेदीका अशोक डोंगरे ही आमच्याकडे घरी आली आहे. काल दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास अॅक्टीव्हा स्कूटी नं. एमएच १६ डीटी ६५५१ माझी भाची वेदीका अशोक डोंगरे हिच्यासोबत एका कापड दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आलो होते. कपडे खरेदी करून सायंकाळी ७:१० वाजताच्या सुमारास सदाफुले वस्तिवर असलेल्या घराकडे जात असताना माझी भाची वेदीका ही स्कुटी चालवत होती व मी पाठीमागे बसलेली असताना सदाफुले वस्ति जवळील टॉवरचे शेजारी मधुकर दळवी यांच्या केशकर्तनालयाच्या दुकानासमोर आम्ही आलो असता पाठीमागून शाईन कंपनीच्या मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम आले.

त्यापैकी एकाचे अंगात काळा शर्ट, चेहरा काळ्या मास्कने झाकलेला व शरीराने सडपातळ, मजबुत तर मागे बसलेला मजबूत असून अंगात पांढरा रंगाचा शर्ट घातलेला असे दोघे शाईन मोटारसायकलवरून आले व त्यांनी माझे गळ्यातील १८ ग्रॅम (५५,००० रुपये जुनी किंमत) वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून घेऊन गेले. यावेळी मी व माझी भाची वेदीका हिने त्या चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यांच्या ताब्यातील शाईन कंपनीची मोटारसायकल ही भरधाव वेगात चालवून निघून गेले.

यानुसार पल्लवी अनिल सानप (वय २८, रा. सदाफुले वस्ति,ता. जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात गंठण चोरांविरुद्ध गु. नं. ०५८०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३९२ नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे हे करत आहेत.

या घटनेमुळे सदाफुले वस्तित भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

Back to top button