बीडब्रेकिंगसंपादकीय

केज न.प.लिपीक आसदभाई खतीब यांना स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नती

मा.मुबश्शिरोदीन खतीब मित्र मंडळ केजच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न

केज ! प्रतिनिधी!

केज नगर पंचायतीच्या स्थापणेपासून स्वच्छता निरीक्षक पदाचा पदभार सांभाळणारे आसदभाई इसाकोद्दीन खतीब यांची लिपिक पदावरून स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याचा आदेश नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक डॉ किरण कुलकर्णी यांनी 4 जून 2021 रोजी निर्गमित केला आहे.
महाराष्ट्रातील एकुण 67 नगर परिषदा आणि नगर पंचायती मध्ये कार्यरत आसलेल्या वीविध पदावर काम करणा-या 67 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असून सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना वेतन व भत्ये मिळणार आहेत.


आसदभाई खतीब यांनी कोरोना काळात अतिशय महत्वाची भुमिका बजावली असून मास्क न वापरणाऱ्यांविरूद्ध व शासनाचे आदेश डावलून दुकाने उघडणाऱ्या दुकानदारां विरूद्ध दंडात्मक कारवाई करून आपले कर्तव्य चोखपणे बजावले आहे. आसदभाई खतीब यांची पदोन्नती स्वच्छता निरीक्षक पदावर झाल्यामुळे त्यांच्यावर मित्र परिवार व कर्मचाऱ्यांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रविवारी त्यांचा शाल श्रीफळ देऊन पहिला कौटुंबिक सत्कार मुश्ताक खतीब ,हाजी अमजद खतीब ,रूस्तुम खतीब ,मुबश्शिरोद्दीन खतीब,हाफिज मुकिम,मजरोद्दीन खतीब,इंतेखाब रुस्तुम खतीब,व निजाम इनामदार यांनी केला असुन खतीब परिवारातील विविध व्यक्ती सर्वात जास्त शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून कार्यरत असुन शासकीय विभाग ,शैक्षणिक, सामाजिक , राजकीय क्षेत्रात खतीब परिवाराचा सर्वत्र चांगला परिवार म्हणुन नावलौकिक असुन याच परिसरातील केज नगर पंचायत मध्ये लिपीक पदावर कार्यरत असणारे आसदभाई खतीब यांची स्वच्छता निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल मा. मुबश्शिरोद्दीन खतीब मित्र मंडळ केजच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सत्कार समारंभ संपन्न झाल्यानंतर पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व सदरील सत्कार समारंभ यशस्वी संपन्न झाला .

Back to top button