पारंपरिक सणांतून संस्कृतीचा वारसा जिवंत ठेवूया – रोहिणीताई काशिद

पारंपरिक सणांतून संस्कृतीचा वारसा जिवंत ठेवूया – रोहिणीताई काशि
वसुबारस निमित्त महिला शिवजन्मोत्सव समितीचा उपक्रम,गायींचे विधिवत पूजन
जामखेड प्रतिनिधी: महिला शिवजन्मोत्सव समिती, जामखेड यांच्या वतीने आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता वसुबारस निमित्ताने महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा सौ.रोहिणीताई काशिद यांनी माता भगिनींसह गायींचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी गिता येवले, निर्मला सावंत,अल्का काशिद,रितु काशिद ,पिंकू दाहितोंडे,शालन गुळवे,स्वाती क्षिरसागर,आरती क्षिरसागर,भारती फरांडे,आदिती उबाळे,आकांक्षा हावळे आदी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सौ. रोहिणी काशिद म्हणाल्या की,वसुबारस हा मातृशक्तीचा आणि गोमातेच्या पूजनाचा सण आहे. आपल्या संस्कृतीत गाईला आईचे स्थान दिले आहे. समाजात संस्कार, संस्कृती आणि एकता टिकवण्यासाठी अशा पारंपरिक सणातून संस्कृती चा वारसा जिवंत ठेवूया.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे संजय (काका) काशिद व त्यांच्या सौभाग्यवती रोहिणीताई काशिद यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात.महिला व मुलींसाठी स्व संरक्षणासाठी लाठी,काठी मोफत प्रशिक्षण, दिपावली पाडव्यानिमित्त दिपोत्सव,गड किल्ले मोहिम, भव्य दुर्गा शक्ती रॅली चे आयोजन करण्यात येते.



