📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

समता व राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र सर्वांनी जपला पाहिजे – राजेंद्र मस्के

समता व राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र सर्वांनी जपला पाहिजे – राजेंद्र मस्के

प्रजासत्ताक दिन व वाढदिवस निमित्ताने पोखरी लिंबा जिल्हा परिषद शाळेस
Smart LED TV भेट…!

बीड प्रतिनिधी:बीड तालुक्यातील मौजे पोखरी लिंबा येथे आज ७७ व्या प्रजासत्ताक दिन व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे चिरंजीव इंजि. रितेश यांच्या वाढदिवसाचे
औचित्य साधून
पोखरी लिंबा ता.बीड जिल्हा परिषद शाळेस  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी Smart LED TV भेट देण्यात आला.
डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी, हा उपक्रमा मागील उद्देश आहे. या उपक्रमामुळे शाळेतील अध्यापन अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण होण्यास निश्चितच मदत होणार आहे. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले की ,
“२६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान लागू झाले, आणि आपल्या देशाने प्रजासत्ताकतेचा नवा पर्व आरंभ केला. ‘जनतेचे, जनतेसाठी आणि जनतेद्वारे चालणारे शासन’ या तत्त्वावर उभे राहणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे राष्ट्राचे आत्मस्वरूप आहे. समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांची जोपासना प्रत्येक नागरिकाने केली पाहिजे.
“प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामाजिक समतेचा संकल्प दिवस आहे. धर्म, जात, प्रांत, भाषा यापलीकडे जाऊन ‘एक भारतीय’ म्हणून जगणे हेच खरी देशभक्ती आहे.”असा राष्ट्रीय संदेश देवुन प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच बिभिषण मुळीक, दादासाहेब खिल्लारे, अशोक फाळके, बद्रीनाथ जटाळ, अश्विन शेळके, राजेंद्र येडे सर, विनायक दळवी, लक्ष्मण झांजुरे,शाहू मुळीक, शिवकुमार टाके, बाबू खिल्लारे, गणेश दळवी,दशरथ दळवी, दादासाहेब भिसे, शामराव कोटुळे सह शिक्षकवृंद, ग्रामस्थ व पालकवर्ग उपस्थित होते.
Back to top button