तेलगाव जि.प गटातून विकासाभिमुख नेतृत्व पौर्णिमा भोजने यांना भाजप कडून सर्वाधिक पसंती.

तेलगाव जि.प गटातून विकासाभिमुख नेतृत्व पौर्णिमा भोजने यांना भाजप कडून सर्वाधिक पसंती.
बीड // प्रतिनिधी:आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे , तेलगाव जिल्हा परिषद गटातून आंबेवडगाव च्या कर्तव्यदक्ष माजी सरपंच तथा मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कट्टर समर्थक सौ पौर्णिमा अशोक भोजने यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळत आहे तेलगाव जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे त्यामुळे या जागेवर प्रतिष्ठेची निवडणूक होणार हे नक्की आहे म्हणून भाजपकडून निष्ठावंत असलेल्या व निवडून येण्याची क्षमता असलेल्या पौर्णिमा भोजने यांनाच तिकीट देण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे त्यांनी याआधी आंबेवडगाव च्या सरपंच म्हणून अतिशय उत्कृष्ट कार्य केले आहे तसेच त्या सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असतात लोकांच्या अडीअडचणी व समस्या दूर करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत काम केलेले आहे म्हणूनच एक विकासाभिमुख कार्य करणाऱ्या व भाजपच्या निष्ठावान असलेल्या सौ पौर्णिमा भोजने यांना तिकीट द्यावे अशी मागणी तेलगाव जिल्हा परिषद गटातील मतदारांनी व्यक्त केली आहे



