📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

ज्येष्ठ शिक्षक रघुनाथराव ढवळे यांचे निधन

ज्येष्ठ शिक्षक रघुनाथराव ढवळे यांचे निधन

जामखेड प्रतिनिधी : शहरातील तपनेश्वर गल्ली येथील रहिवासी व ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी शिक्षक तसेच ढवळे किराणा ॲण्ड एजन्सीचे मालक श्री. रघुनाथराव ढवळे यांचे बुधवारी (दि. १ एप्रिल २०२६ ) दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जामखेड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

ढवळे सर यांनी शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडवले असून, त्यांच्या साध्या, मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.तुषार व द्वारकाधिश यांचे वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे.

Back to top button