📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

खर्डेवाडी येथे गुरुवारपासून श्रीमद् भागवत कथा सोहळ्याला प्रारंभ,कीर्तन, हरिपाठ व ग्रंथ भेट उपक्रमाचे आयोजन

खर्डेवाडी येथे गुरुवारपासून श्रीमद् भागवत कथा सोहळ्याला प्रारंभ,कीर्तन, हरिपाठ व ग्रंथ भेट उपक्रमाचे आयोजन
बीड | प्रतिनिधी
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर बीज उत्सवानिमित्त तसेच किसनराव कळेकर आणि कै. रत्नदीप भागवत कळेकर यांच्या पुण्यस्मरणार्थ खर्डेवाडी (ता. बीड) येथे गुरुवार दि. 26 फेब्रुवारी 2026 पासून श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचा शुभारंभ होत आहे.
नांदूर फाट्याजवळील खर्डेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तुकाराम बीज उत्सव मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने ह.भ.प. रामचंद्र महाराज जगताप (बीड) यांच्या वाणीतून श्रीमद् संगीत भागवत कथा निरूपण होणार आहे. दररोज दुपारी 1 ते 5 या वेळेत भागवत  होईल.
सोहळ्यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत खर्डेवाडी भजनी मंडळाचा हरिपाठ होणार आहे.
त्रिदिनी किर्तन महोत्सव
या श्रीमद् भागवत कथा सोहळ्याच्या निम्मित तीन दिवस कीर्तनाचे आयोजित करण्यात आले आहेत.यामध्ये ह भ प श्रीनिवास महाराज जगताप,पालसिंगण, ह भ प नारायण महाराज शिरसट आणि ह भ प केशवदास वैष्णव महाराज हिंगणी यांचे हरिकीर्तन होणार आहे या कीर्तनाला गावातील प्रतीक नागरिकांनी सौजन्य केले आहे .
ग्रंथ भेट उपक्रम
‘ज्ञानोबा-तुकोबा आपल्या घरी’ या उपक्रमांतर्गत ह.भ.प. हरिदास महाराज सोळंके आणि ज्ञानेश्वरी भावकथा प्रवक्ते ह.भ.प. माधव महाराज डाके यांच्या संयोजनातून ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा या ग्रंथांची स्नेहभेट साधकांना देण्यात येणार आहे. भागवत कथा समाप्ती व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त
दि. 5 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ह.भ.प. राजन महाराज भोसले यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
सात दिवस चालणाऱ्या या भागवत कथेचा श्रवणाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक  समस्त कळेकर  परिवार,महादेव (नाना )साळुंके  बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button