रत्नागिरी

राहुल कोकाटे यांची शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंडणगड तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

राहुल कोकाटे यांची शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंडणगड तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

मंडणगड प्रतिनिधी

मंडणगड नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राहुल कोकाटे यांची नियुक्ती शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंडणगड तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुरेश नळे यांनी राहुल कोकाटे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या पक्षाच्या मंडणगड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले आहे. राहुल कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

मंडणगड शहरातील व्यावसायिक म्हणून लौकिक असलेले राहुल कोकाटे यांच्याकडे युवा नेतृत्व म्हणून पाहिले जाते. आपल्या राजकीय कारकिर्दीत कोकाटे यांनी २०१५ साली झालेल्या मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजय मिळवला होता. कोकाटे यांच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी शहराध्यक्ष म्हणून तालुक्यात आपला प्रभाव निर्माण केला. मंडणगड शहर, तालुका तसेच जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सतत कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना तालुकाध्यक्षपदी नेतृत्वाची धुरा सोपविल्याचे बोलले जात आहे.

Back to top button