बीड

शेवगाव मध्ये सकल हिंदू समाजाकडून पाकिस्तानाच्या प्रतिकात्मक ध्वजाचे दहन !

शेवगाव मध्ये सकल हिंदू समाजाकडून पाकिस्तानाच्या प्रतिकात्मक ध्वजाचे दहन !

 

अहिल्या नगर/प्रशांत बाफना
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शेवगाव शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने आज गुरुवार दि २४ रोजी सकाळी शेवगाव क्रांती चौकात पाकिस्तानचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. भारत ‘माता की जय’ ‘वंदे मातरम’ आदी देश प्रेमाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आता तमाम भारतीय बांधवांना ठोस कारवाईची प्रतीक्षा असल्याच्या भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला नेत्या विद्याताई गाडेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनीही दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविला दिलीप भागवत، एकनाथ कुसळकर، शिरीष भारदे، अच्युता नंद सरस्वती महाराज यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंह सुंदर डे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button