बीड
प्रभाग 17 मध्ये जनतेचा एक हाती निर्णय यावेळी बदल घडणार !

प्रभाग 17 मध्ये जनतेचा एक हाती निर्णय यावेळी बदल घडणार !
शेख सुरया–शेख निसार यांच्या प्रचार फेरीत प्रचंड उत्साह
*_नगराध्यक्षपदासाठी संध्याताई दीपकराव देशमुख ‘ऐतिहासिक विजयाकडे’ – मतदारांचा निर्धार_*
“स्थानिक नागरी समस्या, दादागिरी आणि निर्माण झालेली दहशत यांना कायमचा पूर्णविराम देणार”
“इतिहास घडणार आहे… संध्याताई प्रचंड मतांनी विजयी होणार!”
परळी (प्रतिनिधी) –
परळी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 17 मध्ये उमेदवार शेख सुरया सद्दाम हुसेन व शेख निसार नसीर यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या प्रचार फेरीने आज अभूतपूर्व असा जनसागर अनुभवण्यास मिळाला.
या भव्य फेरीस जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड, तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. या नेतृत्वामुळे प्रभागातील उत्साह आणखी द्विगुणित झाला.
प्रभागातील युवकांनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. “स्थानिक नागरी समस्या, दादागिरी आणि निर्माण झालेली दहशत यांना कायमचा पूर्णविराम देणार” असा ठाम आवाज आज जनतेकडून उमटला.
*संध्याताई दीपक देशमुख – जनतेच्या आशेची दिशा, इतिहास घडवणारा विजय!*
प्रचार फेरीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्याताई दीपकराव देशमुख यांच्याबद्दल प्रभागातील मतदारांनी अभूतपूर्व विश्वास व्यक्त केला. दादागिरी, भ्रष्टाचार, हुकूमशाही यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी लोकांनी ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतल्याचे स्पष्ट दिसून आले.
संध्याताई देशमुख यांच्या प्रामाणिक कारभाराची, सर्वसमावेशक नेतृत्वशैलीची आणि जनहितासाठीच्या अखंड संघर्षाची जनतेने उजळणी केली.
त्यामुळेच या निवडणुकीत “इतिहास घडणार आहे… संध्याताई प्रचंड मतांनी विजयी होणार!” असे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
प्रभाग 17 मधील हा उत्साह, समर्थन आणि निर्धार पाहता परळीच्या राजकारणात मोठे परिवर्तन घडत असल्याचे संकेत आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत.



