बीड

जामखेड शहरातील व्यापारी पोपटलालजी फिरोदिया यांचे निधन

जामखेड शहरातील व्यापारी पोपटलालजी फिरोदिया यांचे निधन

जामखेड प्रतिनिधी:जामखेड शहरातील गोरोबा टाॅकीज रोड, कुंभार तळे येथील राहिवासी प्रसिद्ध उद्योगपती तथा जैन श्रावक संघाचे संचालक संतोषशेठ , शितलशेठ ,सचिन शेठ व सौ. मनीषा अभयजी कटारिया,(अहिल्यानगर) यांचे वडील श्री.पोपटलाल लालचंदजी फिरोदिया (वय ७६) यांचे आज, बुधवार दि. २८ मे २०२५ रोजी आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या निधनाने जामखेड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोपटलालजी हे सर्वांमध्ये मनमिळावूपणासाठी व शांत स्वभावासाठी ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ व आदर्श व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

अंत्यसंस्कार आज बुधवार दि. २८ मे २०२५ दुपारी ३.०० वाजता जामखेड येथील अमरधाम येथे होणार आहेत.

या दुःखद प्रसंगी फिरोदिया कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

Back to top button