बीड
सौ. के.एस.के. महाविद्यालयातील आधुनिक रेकॉर्ड रुमला संस्थेच्या सहसचिव डॉ. सौ. दीपाताई क्षीरसागर यांची भेट

बीड (प्रतिनिधी)ः सौ. के.एस.के. महाविद्यालयात डिजीटल दस्तऐवज व्यवस्थापनावर आधारित उभारण्यात आलेल्या आधुनिक रेकॉर्ड रुमला नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ. सौ. दीपाताई क्षीरसागर यांनी भेट देऊन पाहणी केली. डेटा सुरक्षितता, दस्तऐवजांचे केंद्रीकृत डिजिटायझेशन व प्रशासकीय प्रक्रीयेची अचुकता वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सुविधांची त्यांनी माहिती घेतली.
रेकॉर्ड रुमचे व्यवस्थापक श्री. नवनाथ कातखडे यांनी रुमची रचना, तांत्रिक व्यवस्था, डिजीटल आर्काइव्हिंग प्रक्रिया आणि सुरक्षा प्रणाली यांचा सविस्तर आढावा सादर केला. त्यांनी दस्तऐवजांची वर्गीकरण, स्कॅनिंग आणि संग्रहन यासाठी वापरल्या जाणार्या प्रक्रियांची माहितीही दिली. या भिटीदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आधुनिक रेकॉर्ड रुममुळे महाविद्यालयाच्या दस्तऐवजीकरण व्यवस्थेत गती, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
याभेटी दरम्यान संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विश्वांभर देशमाने, डॉ. सुधाकर गुट्टे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक डॉ. जालिंदर कोळेकर तसेच सर्व विभाग प्रमुख व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.