बीड

जिल्हा शास्वत विकास मंथनासाठी गुरूवारी बैठक उपस्थित राहण्याचे आवाहन

जिल्हा शास्वत विकास मंथनासाठी गुरूवारी बैठक
उपस्थित राहण्याचे आवाहन
बीड :-अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज 2032 शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’) या पत्रकारांच्या पुढाकारातून राबवयाच्या कार्यक्रम मालिकेअंतर्गत  साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रशासनातील अधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बीड जिल्हा शाश्वत विकास मंथन बैठकीचे दि. 10 एप्रिल 2025 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, विधी व न्याय क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले असुन पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक दिलीप खिस्ती, समन्वयक विशाल साळुंके, अनिल जाधव यांनी केले आहे.
शहरातील केएसके महाविद्यालयाच्या सभागृहात सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील राजकीय, शासकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, पर्यावरण, उद्योग व्यापार यासह विविध क्षेत्रातील संस्था तसेच युवा वर्ग, महिला संघटना व नागरिकांच्या सांघिक सहकार्यातून प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व नव माध्यमातील पत्रकार आगामी काळासाठी विशेष उपक्रम राबविणार आहेत. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्थातच राजकीय व सर्व क्षेत्रातील सामाजिक संस्थांचा आणि मुख्य म्हणजे शासकीय, निम शासकीय अधिकार्‍यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.  बैठकीमध्ये ज्येष्ठ पत्रकार डॉ. अनिल फळे हे सदर कार्यक्रम मालिकेबद्दल सादरीकरण करतील. त्या सादरीकरणाच्या अनुषंगाने आपल्या सूचना व सहकार्य लक्षात घेऊन बीड शहर व जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम राबविले जातील; त्यासंबंधी आपल्या सूचना, सहकार्य व मार्गदर्शन आवश्यक आहे. या बैठकीसाठी संबंधितांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Back to top button