अंबाजोगाईत गुरुवारी आज रंगणार संत जनाबाई, नामदेवाच्या पालखीचा रिंगन सोहळा

अंबाजोगाईत गुरुवारी आज रंगणार संत जनाबाई, नामदेवाच्या पालखीचा रिंगन सोहळा
—–
*भाविकांनी उपस्थित रहावे – स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा*
—–
अंबाजोगाई प्रतिनिधी. बालाजी देशमुख-: संत शिरोमणी नरसीच्या नामदेव महाराज व गंगाखेडच्या संत जनाबाई यांच्या दिंडया आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे प्रस्थान करत आहेत.वारकरी सांप्रदायामधे संतश्रेष्ठ नामदेव महाराज व संत जनाबाई यांच्या पालखीचा भव्य असा अश्व रिंगण सोहळा गुरुवारी २६ जून रोजी योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे. त्यासाठी रिंगन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. अशी माहिती स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी दिली.
पंढरपुरच्या आषाढी एकादशीला राज्याच्या विविध भागातुन दिंड्या मधील वारकरी पताका घेऊन प्रस्थान झाल्या आहेत. मराठवाड्यातील भाविकांना पालख्याच्या रिंगणाचा आनंद घेण्यासाठी संधी नसली तरी एकमेव अंबाजोगाईत संत जनाबाई व नामदेेवाच्या पालखीचा आश्व रिंगन सोहळा मागील आठ वर्षापासुन रंगत आहे. हा भाविकासाठी महत्वपुर्ण ठरु लागला आहे. या दोन्हीही मुख्य संताच्या पालख्यासह इतर पंधरा पालख्याचे मनोहर अंबानगरीत एकत्र होतात. २६ जून गुरुवारी सायंकाळी ४.०० वाजता भव्य अश्व रिंगन सोहळा योगेश्वरी मैदानावर रंगणार आहे. या भव्य अशा रिंगन सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, कार्याध्यक्ष बाबा महाराज जवळगावकर, प्रकाश बोरगावकर, दिलीप सांगळे, दिलीप गित्ते, बळीराम चोपणे, व संयोजन समितीने केले आहे.
—-
विद्यार्थ्यांसाठी वारकरी वेशभूषा दिंडी स्पर्धेचे आयोजन:
संत नामदेव व जनाबाई यांच्या पालखीचा आश्वरिंगन सोहळा सायंकाळी चार वाजता रंगणार असुन शालेय विद्यार्थांसाठी
वारकरी वेशभूषा दिंडी स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी दुपारी २ वा योगेश्वरी मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेत शहरातील शालेय विद्यार्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.



