📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात नवीन नेतृत्व ; आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात नवीन नेतृत्व ; आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार

‘रयत’च्या उत्तर विभाग सल्लागारपदी राजेंद्र कोठारी यांची निवड

मा. श्री. राजेंद्र कोठारी यांचा सत्कार – आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गौरव

जामखेड प्रतिनिधी : ‘रयत शिक्षण संस्थेच्या’ उत्तर विभागीय सल्लागार मंडळाची सहविचार सभा नुकतीच अहिल्यानगर येथे संपन्न झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी पंचायत समिती सभापती मा. श्री. राजेंद्र कोठारी यांची ‘उत्तर विभाग सल्लागार’ पदावर निवड झाल्याने उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी आमदार रोहित पवार, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. अरुण कडू पाटील, व्हा. चेअरमन अँड. भगिरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मिनाताई जगधने, मा. आमदार दादाभाऊ कळमकर, मा. आमदार बबनराव पाचपुते, मा. आमदार राहुल जगताप, मा. बाबासाहेब भोस, मा. आंबादास पिसाळ यांच्यासह उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी मा. नवनाथ बोडके, तसेच उत्तर विभागातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

*प्रतिक्रिया*
“रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग सल्लागारपदी जबाबदारी मिळाल्याचा मला अभिमान आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. संस्थेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याची संधी मिळाल्याने मी आभारी आहे.” संस्थेच्या विकासासाठी सक्रिय योगदान देणार

राजेंद्र कोठारी
रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग सल्लागार

Back to top button