आरोग्यबीडराजकीय

लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे साहेबांचे कार्य कायम स्मरणात राहील-जि.प.सदस्य विजयकांत मुंडे

विडा गटातील सर्व गावांना निर्जंतुकीकरण औषधाचे तर आरोग्य कर्मचार्यांना मास्कचे वाटप..!!

जि.प.सदस्य विजयकांत मुंडेंचा स्तुत्य उपक्रम..

केज ! प्रतिनिधी

लोकनेते गोपिनाथराव मुंडे साहेबांनी गोरगरीब,दीनदलित,वंचित घटकांना सोबत घेऊन काम केले आसून त्यांचे कार्य नक्कीच कायम स्मरणात राहील असे प्रतिपादन विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी विडा येथिल कार्यक्रमा प्रसंगी केले.

लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणा निमित्त विडा येथिल रेणुका नर्सिंग स्कूलच्या प्रांगणात स्व.गोपिनाथराव मुंडे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांच्या संकल्पनेतून विडा गटातील सर्व गावांना सोडियम हायड्रोक्लोराईड निर्जंतुकीकरण औषधाचे व विडा प्रा.आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचार्यांना मास्क व साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिला कांबळे,विड्याचे सरपंच सुरज पटाईत,गप्पेवाडीचे सरपंच अशोक केदार,जेष्ठ नेते अशोक वाघमारे,बालाप्रसाद भुतडा,ग्रामपंचायत सदस्य डाॅ.धनराज पवार,अंकुश कलाणे,शिवाजी वाघमारे,दत्ता गित्ते,दत्ता कोरडे,सुरेश यादव,बाबासाहेब मुळे,बाजीराव कोरडे,समिरसिंह देशमुख,राजेभाऊ देशमुख,बारीकराव भोसले,अभिमान पटाईत,नामदेव भोसले,प्रकाश रोमन,बाजीराव गायकवाड,बप्पा बर्दापूरकर,अशोक भोसले यांच्यासह आरोग्य कर्मचार्यांची उपस्थित होते.

Back to top button