संपादकीय

संप बेकायदेशिर ठरविल्यास एका दिवसाला ८ दिवसांचा पगार कापणार

 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्या यावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागच्या दोन आठवड्यापासून आंदोलन करत असून या आंदोलनातून अद्याप तोडगा निघालेला नाहीये, त्यातच परिवहन मंत्री आणि परब यांनी आता एसटी कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पगारवाढ केल्यानंतर आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याची घोषणा दिली.

विलीनीकरण्म वगळता इतर मागण्या मान्य झाल्याचे जाहीर करताच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केलं होतं या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना पगार कपातीचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि कर्मचारी यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनिल परब म्हणाले, न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवला तर एक दिवसाला ८ दिवसांची पगारकपात केली जाईल. कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान करायचे नाही. जे कर्मचारी कामावर येतील त्यांना संरक्षण दिलं जाईल. एसटीने प्रवास करणारे प्रवासी हे आपलं दैवत आहेत. त्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली तर एसटी अडचणीत येईल. कामगारांनी कारवाई करण्यासाठी भाग पाडू नये. असेही परब म्हणाले.

Back to top button