बीड
जामखेड तालुक्यात लंम्पीचा शिरकाव; पशुवैद्यकीय सेवा रामभरोसे

जामखेड तालुक्यात लंम्पीचा शिरकाव; पशुवैद्यकीय सेवा रामभरोसे
जामखेड प्रतिनिधी –जामखेड तालुक्यात लंम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले असून पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खर्डा येथील शेतकरी सुरेश ढेरे यांच्या गाईला तीन दिवसांपासून लंम्पीची लक्षणे आढळल्याने त्यांनी खाजगी उपचार घेण्याचा मार्ग पत्करला असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
संपूर्ण तालुक्यात पशुवैद्यकीय सेवेची दुरवस्था असून आवश्यक पदे रिक्त आहेत. तीन आवश्यक अधिकाऱ्यांपैकी दोन अधिकारी अतिरिक्त कारभार पाहत आहेत. सात पैकी एक दवाखाना देखील कर्मचारीविना बंद स्थितीत आहे.
दुष्काळग्रस्त जामखेड तालुक्यात दुग्ध व्यवसाय हे शेतकऱ्यांचे प्रमुख आधार आहे. अशा परिस्थितीत लंम्पीचा फैलाव व शासकीय दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे.



