बीड

लिंबागणेश परिसरात बिबट्यांची वाढती हालचाल; शेतकरी भयभीत कृषी पंपासाठी दिवसा विद्युतपुरवठ्याची मागणी – गुरुवारी रास्तारोको आंदोलनाची चेतावणी :– डॉ. गणेश ढवळे

लिंबागणेश परिसरात बिबट्यांची वाढती हालचाल; शेतकरी भयभीत
कृषी पंपासाठी दिवसा विद्युतपुरवठ्याची मागणी – गुरुवारी रास्तारोको आंदोलनाची चेतावणी :– डॉ. गणेश ढवळे

लिंबागणेश :- (दि. ०९)
बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात बिबट्या आढळून आल्याने ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी कृषी पंपांचे विद्युतपुरवठा सुरू असल्याने शेतकऱ्यांना अंधारात शेतात जावे लागते आणि त्यामुळे त्यांच्या जिवीतास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर कृषी पंपांसाठी रात्रीऐवजी दिवसा नियमित विद्युतपुरवठा सुरू करावा, या मुख्य मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे जिल्हा अध्यक्ष डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि. ११ डिसेंबर, गुरुवार रोजी लिंबागणेश बसस्थानक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची लेखी नोटीस जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता महावितरण बीड व सहाय्यक अभियंता उपकेंद्र लिंबागणेश यांना देण्यात आली आहे.

पोखरी व पिंपरनई परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्यांचा वावर वाढल्याची माहिती दिल्याने भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात पूर्वीही शेतकरी व ग्रामस्थ मृत्युमुखी पडल्याच्या घटना झाल्या असल्याने या परिस्थितीकडे दुर्लक्ष धोकादायक ठरू शकते.

लिंबागणेश, पिंपरनई, पोखरी, बेलगाव, सोमनाथवाडी, मसेवाडी, मोरगाव, फुकेवाडी, काळेवाडी व गणेशनगर या भागांमध्ये रात्रीचा विद्युतपुरवठा थांबवून दिवसा नियमित व पुरेसा पुरवठा द्यावा, अशी ठाम मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Back to top button