देशविदेश

मिस्टर फडणवीसांकडून खंडणीखोर सैतानाची तरफदारी, संजय राऊतांनी लगावला टोला

 

दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. महाराष्ट्रातील खंडणीखोर आणि वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? असा सवाल फडणवीस यांनी केला होता. आता फडणवीसांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

राऊत म्हणाले की, अशा प्रकारच्या निवडणुका भाजपनं लढवल्या नाहीत का? आम्हाला खंडणीखोर म्हणत असाल तर इथे भाजप प्रशासक खंडणीखोरीवर फडणवीस बोलत नाहीत? इथली जनता त्रस्त आहे. म्हणून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. मिस्टर फडणवीस खंडणीखोर सैतानाची तरफदारी करत आहेत, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, फडणवीस यांना बोलायचे ते बोलू द्या. भाषणात ते टाळीची वाक्ये घेतात. पण काल इथे त्यांना टाळ्याही पडल्या नाहीत असं मला कळलं. फडणवीस यांना वाटत असेल की ते इथे आल्याने मराठी मतदान भाजपच्या पारड्यात पडेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. इथली मराठी जनता पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे, असा दावाही संनज राऊत यांनी केला होता.

Back to top button