📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

शिवजयंती निमित्त शिवसंग्रामच्या वतीने आयोजित छावा चित्रपटाला प्रचंड गर्दी 

शिवजयंती निमित्त शिवसंग्रामच्या वतीने आयोजित छावा चित्रपटाला प्रचंड गर्दी
विद्यार्थी, महिला, तरुण आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
दिव्यांग विद्यार्थी, निराधार महिला, ऊसतोड मजुरांच्या मुलांनी घेतला चित्रपटाचा आनंद
बीड (प्रतिनिधी);- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसंग्राम च्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा आणि जीवनपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्या करिता दिव्यांग विद्यार्थी ,महिला, ऊसतोड मजुरांची मुले, निराधार महिला आणि शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांसाठी  “छावा” चित्रपटच्या मोफत शोचे आयोजन शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या वतीने दि. २५ रोजी दुपारी बीड येथील तनिष्क सिनेमा येथे करण्यात आले होते. हा चित्रपट मोफत पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करण्यात आली होती. या प्रसंगी प्रभाकर कोलंगडे, नारायणराव काशीद, सुभाष जाधव, अनिल घुमरे, सुहास पाटील, पंडित माने, बाळासाहेब हावळे, गोपीनाथ घुमरे ,सचिन काळकुटे आदी. उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पहावा आणि संभाजी महाराजांचा जीवनपट सर्वांना अनुभवता यावा या करिता या शोची आयोजन काण्यात आले होते. जास्तीत जास्त संख्येने महिला आणि विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. दिव्यांग विद्यार्थी आणि ऊसतोड मुलांच्या पाल्यांना हा चित्रपट पाण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने हे विद्यार्थी समाधान व्यक्त करत होते. चित्रपट पाहतेवेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने सिनेमागृह दणाणून गेले होते. हा शो आयोजित केल्या बद्दल तीनही शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षक महिला, विद्यार्थी यांनी डॉ. ज्योती मेटे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
चौकट
विद्यार्थ्यांनी मानले डॉ. ज्योती मेटे यांचे आभार
चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी डॉ.ज्योती मेटे यांचे आभार मानले त्याचबरोबर ऊसतोड मजुरांच्या मुलांनी आणि महिलांनी देखील डॉ.ज्योती मेटे यांचा सत्कार करत आभार मानले.
Back to top button