संपादकीय

प्राचार्य आबासाहेब हांगे उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित

प्राचार्य आबासाहेब हांगे उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी / पाटोदा -येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांना महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत २०२४-२५ वर्षातील बीड जिल्हा पातळीवरील उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला असून प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांना करिअर कट्टा अंतर्गत महाविद्यालयात विविध उपक्रमांच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

प्राचार्य हांगे यांच्या या उपलब्धिबद्दल नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर, सहसचिव डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर यांनी प्राचार्य आबासाहेब हांगे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.  तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पाटोदा शहरातील प्रतिष्ठित नागरिक, माजी विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Back to top button