तळे पिंपळगावात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

तळे पिंपळगावात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न
प्रतिनिधी / पाटोदा – तालुक्यातील मौजेतळे पिंपळगाव जि. प. प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच स्नेहा शशिकांत चौरे, उपसरपंच सुरेखा मधुकर चौरे, ग्रामविकास अधिकारी संगीता माने, शिवाजी सुसलादे, भरत महाराज चौरे, तसेच शालेय समितीच्या अध्यक्ष रुपाली चौरे, उपाध्यक्ष भाग्यश्री सुसलादे, अण्णा येवले व संकेत चौरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी नृत्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गायन स्पर्धा आदि स्पर्धांचे बक्षीस वितरण ध्वजारोहणानंतर करण्यात आले. मुख्याध्यापिका जयश्री जाधव, नंदिनी क्षीरसागर, कुमटकर मॅडम, पद्मिनी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना माजी सरपंच बाळासाहेब चौरे यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पेन, रजिस्टर, पॅड व इतर शालेय साहित्य बक्षीस स्वरूपात वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन क्षीरसागर मॅडम यांनी केले.



