📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

लोकप्रतिनिधींनी जामखेडला यावे; अन्यथा आंदोलन तीव्र– विकास (तात्या) राळेभात

लोकप्रतिनिधींनी जामखेडला यावे; अन्यथा आंदोलन तीव्र– विकास (तात्या) राळेभात

जामखेड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८-डीच्या रखडलेल्या कामामुळे संताप व्यक्त करत, लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष जामखेडला भेट द्यावी,अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा युवा नेते विकास (तात्या) राळेभात यांनी दैनिक महाराष्ट्र सुर्योदय न्यूज शी बोलताना दिला आहे.

राळेभात म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे,आ.रोहित पवार,माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व खासदार निलेश लंके यांनी जामखेड येथे येऊन परिस्थितीची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधलेला नाही,तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.जामखेड तहसीलसमोर आमरण उपोषणाप्रसंगी बोलताना सांगितले.

शहरातील राष्ट्रीय महामार्ग ५४८-डीचे काम गेल्या काही महिन्यांपासून संथ गतीने सुरू असून अतिक्रमणाचा प्रश्नही प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीची मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.अशा परिस्थितीत नेते मंडळी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अतिक्रमण बाबत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शहरातील अतिक्रमणाविरोधात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात पुढाकार घेऊन समन्वय साधावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे

Back to top button