बीडब्रेकिंगमहाराष्ट्र

14 एप्रिल पासून बंद असलेली एसटी बस सोमवार पासून प्रवाशाच्या सेवेत धावणार

धनंजय कुलकर्णी । धारूर

14 एप्रिल पासून बंद असलेली एसटी बस सोमवार पासून प्रवाशाच्या सेवेत धावणार

बीड जिल्ह्यातील मागील दीड महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे बस सेवा बंद ठेवण्यात आली होती .

उद्या दि 7 जुन सोमवार पासून महाराष्ट्र अनलॉक ची घोषणा करून राज्यातील बंद असलेली एसटी महामंडळाची बस पुन्हा प्रवाशासाठी धावणार आहे .

प्रवाशांना प्रवास करताना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे व बस सॅनिटायझर करणे आगार प्रमुखांना बंधनकारक आहे . बस मध्ये 100% प्रवाशी वाहतुकीस परवानगी दिली आहे जिल्हयातील सर्व आगारातून बस सेवा सुरु होणार आहे त्यामुळे यापुढे प्रवाशांची गैरसोय होणार नाही . तरी प्रवाशानी कोरोनाच्या नियमाचे पालन करून प्रवास करावा .

जिल्हयातील धारूर आगारा मधुन केज अंबाजोगाई, माजलगांव साठी प्रति तासाला तर बीड साठी प्रती दोन तासानंतर आणि धारूर ते मुंबई वेळेनुसार सोडण्यात येणार तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावी अशी माहिती आगार प्रमुख शंकर स्वामी यांनी दिली आहे

Back to top button