बीड

नेता कसा हवा तर आमदार रोहितदादा पवार यांच्यासारखा!

नेता कसा हवा तर आमदार रोहितदादा पवार यांच्यासारखा!

तुमचे स्वप्न पूर्ण करा,तुम्हाला कलेक्टर व्हायचंय ना – आमदार रोहित पवार

जामखेड प्रतिनिधी;-कर्जत-जामखेड मतदारसंघाचा नेता हा फक्त लोकप्रतिनिधी नसावा, तर तो प्रत्येक सामान्य माणसाचा आधारही असावा. गरजूंना साथ देणारा, संकटात धावून जाणारा आणि समाजाला जोडणारा नेता असावा. आमदार रोहितदादा पवार हे अशाच नेतृत्वाचे एक उत्तम उदाहरण आहेत. मतदारसंघातील नागेश विद्यालयात इयत्ता ९ वीमध्ये शिकणाऱ्या जुळ्या बहिणी, दिव्या आणि दिक्षा आढाव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर जामखेडच्या शिलादीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही माहिती समजताच आमदार रोहितदादा पवार यांनी तातडीने हॉस्पिटलला भेट दिली, त्यांची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.अशी माहिती पांडुरंग माने यांनी दिली.

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच, आमदार रोहित पवार थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचले.यावेळी हाॅस्पिटल चे संचालक डॉ प्रशांत गायकवाड, डॉ सादेख पठाण, डॉ भरत देवकर, प्राचार्य बी.के.मडके, विजयसिंह गोलेकर,राजेंद्र गोरे,प्रशांत राळेभात,महेंद्र राळेभात,वसिम सय्यद, बिभीषण धनवडे,संपत राळेभात,उमर कुरेशी,प्रविण उगले, महेश राळेभात,अमोल गिरमे, मयुर भोसले, सचिन शिंदे,बिलाल शेख ,मारुती बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
‌ यावेळी आ.पवार यांनी त्या भगिनींच्या तब्येतीची चौकशी केली,त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना हिंमत दिली. तुमच्या शिक्षणाची काही काळजी करू नका, संपूर्ण जबाबदारी मी घेतो. तुमचे स्वप्न पूर्ण करा. तुम्हाला कलेक्टर व्हायचंय ना? मग अभ्यासावर लक्ष द्या! अशा शब्दांत त्यांनी त्या दोघींना प्रोत्साहित केले. त्या मुलींसाठी ही भेट म्हणजे केवळ धीर देण्याचा प्रयत्न नव्हता, तर त्यांच्या भविष्याची जबाबदारी उचलण्याचे आश्वासनही होते. एका वडिलधाऱ्याप्रमाणे त्यांनी त्यांना समजावले आणि नव्याने आयुष्य सुरू करण्याची प्रेरणा दिली. दिव्या आणि दिक्षा यांच्या जीवनातील संघर्ष केवळ त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने मर्यादित नाही. त्यांची आई त्यांना लहानपणीच सोडून गेली. आजोबांनी एकट्याने त्यांचा सांभाळ केला. दुर्दैवाने, काही दिवसांपूर्वीच आजोबांची पत्नी निधन पावली, त्यामुळे आता हे वृद्ध आजोबा एकट्याने या जुळ्या बहिणींचे पालनपोषण करत आहेत. आमदार रोहित पवार यांनी त्यांचीही भेट घेतली, त्यांचे दुःख जाणून घेतले आणि त्यांना आधार दिला.

*चौकट*

मतदारसंघात अनेक लोकप्रतिनिधी येतात-जातात, पण कोणी आपले दुःख ऐकते का? कोण मदतीचा हात देतो का? हा मोठा प्रश्न असतो. परंतु रोहित पवार हे या सगळ्यांना अपवाद आहेत.गरज पडली की धावून जाणारा माणूस म्हणजे रोहितदादा पवार! आमदारकी हा केवळ अधिकार मिळवण्याचा प्रकार नाही, तर तो उत्तरदायित्व निभावण्याचा वसा असतो. रोहितदादा हे नेमके तेच करत आहेत. मतदारसंघातील कोणतीही व्यक्ती संकटात असली की, ती स्वतःला एकटी समजू नये, हा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो. कर्जत-जामखेड हा फक्त मतदारसंघ नाही, तर एक कुटुंब आहे, हे आमदार रोहितदादा पवार वारंवार कृतीतून दाखवून देतात. आज त्यांनी त्या भगिनीला आधार दिला, त्यांच्या भविष्याची जबाबदारी उचलली.

पांडुरंग माने
विभाग प्रमुख – विमुक्त भटके जमाती, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा

Back to top button