बीड

विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर सुधारण्यात योगदान; संतोष घोलप यांचा सत्कार

विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर सुधारण्यात योगदान; संतोष घोलप यांचा सत्कार

हस्ताक्षर स्पर्धेत श्रीरुद्र घोलपची जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाची घवघवीत कामगिरी

जामखेड प्रतिनिधी: दिनांक : ३१ जानेवारी २०२६ रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत हस्ताक्षर (लेखन) या प्रकारात किशोर गटातून जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,माळीवस्ती शिऊर,शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी श्रीरुद्र संतोष घोलप याने अहिल्यानगर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.त्याच्या या यशात श्रीमती पिंपरे मॅडम, श्री.संतोष भोंडवे सर,श्री.निंबाळकर सर यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले. श्रीरुद्रचे वडील नवीन मराठी प्राथमिक शाळा जामखेड येथे शिक्षक असून हस्ताक्षर सुधारणेवर श्री अक्षरसिद्धी सुंदर हस्ताक्षर वर्ग यामाध्यमातून काम करत आहेत .यावेळी जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.प्रदीप चव्हाण,विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, केंद्रप्रमुख श्री.विक्रम बडे, भाजपा शहर मंडलअध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद, उद्योगपती उमेश माळवदकर, नितीन शास्त्रकार यांनी श्रीरुद्रचे अभिनंदन केले.श्रीरुद्र ने संपादन केलेल्या यशाबद्दल पंचक्रोशीतून,तालुक्यातून तसेच समस्त जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Back to top button