बीड
बाळासाहेब राऊत प्रभाग क्र.२५ मधून निवडणुकीच्या रिंगणात

बाळासाहेब राऊत प्रभाग क्र.२५ मधून निवडणुकीच्या रिंगणात
प्रभागातील विकासकामांसाठी बाळासाहेब राऊत या तरुणालाच निवडून देणार; नागरिकांचा निर्धार
बीड दि. ०५ (प्रतिनिधी) काल राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी तारखा जाहीर झाल्या आहेत. बीडमधील देखील नगर पालिकेची निवडणूक होणार असल्याने वातावरण चांगलेच तापू लागले आहे. बीड शहरातील अनेक प्रभागात इच्छुक उमेदवारांची नावे पुढे येत आहेत. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, एम.आय.एम, यासह अनेक पक्षाकडून उमेदवारी अर्ज देण्यात येत असून इच्छुकांकडून या अर्जाची खरेदी केली जात आहे. शहरातील प्रभाग क्रमांक २५ मधील ‘अ’ ही जागा सर्वसाधारण महिला तर ‘ब’ ही जागा सर्वसाधारण साठी आरक्षित झाली आहे. या प्रभागात जवळपास ५५०० मतदार आहेत. या भागातून अनेक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. त्यातील एक नाव म्हणजे बाळासाहेब अंबादास राऊत हे समोर येत आहे. बाळासाहेब राऊत हे प्रभाग क्रमांक २५ मधील ‘ अ’ या जागेवर त्यांच्या मातोश्री यांना निवडणुकीत उभे करणार आहेत. बाळासाहेब राऊत हे मागील १५ वर्षापासून सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करत आहेत. अतिशय शांत आणि संयमी असा तरुण स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. बाळासाहेब राऊत हे सर्वसामान्य जनतेत, सर्व समाजात मिळून मिसळून काम करणारे युवा तरुण आहेत. ते प्रत्येकाच्या सुखदुःखात कायमच धाऊन जातात. प्रभागात गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव, महापुरुषांच्या जयंती यासर्व कार्यक्रमात अग्रेसर राहून सर्व सण उत्सव पार पाडतात. प्रभाग क्रमांक २५ मध्ये विविध जाती धर्मातील नागरिक राहतात त्या सर्वांसोबत त्यांचे चांगले आणि मैत्रीचे संबंध आहेत. त्यांनी आत्तापर्यंत आपल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक सामाजिक उपक्रम राबवून सर्व जातीधर्मातील गोर गरीब लोकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी मागील काळात अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखाली प्रमाणिक आणि एकनिष्ठ राहून काम केले आहे. विकासकामे होत नसल्यामुळे त्यांनी नेत्यांची साथ सोडली. त्यांनी कायमच विकासकामांना प्राधान्य दिले. स्वतः च्या फायद्याचा विचार केला नाही. त्यामुळे त्यांनी विकासकामांच्या बाबतीत कधीच तडजोड केली नाही. प्रभागातील विकासकामांसाठी त्यांनी नेहमीच नगरपालिकेत पाठपुरावा केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यातून प्रभागातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यांनी स्वच्छता,लाईट, पाइपलाइन यासारखे मूलभूत प्रश्न सोडवले आहेत. स्थानिक नागरिक देखील अडचण आल्यास त्यांच्याकडेच जाऊन आपल्या अडीअडचणी मांडून त्या सोडवून घेतात. त्यामुळे बाळासाहेब राऊत या स्थानिक तरुणानेच आपल्या भागातील नेतृत्व करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. बाळासाहेब राऊत हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या तरुण चेहऱ्याला जर संधी दिली तर नक्कीच या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी नागरिकांतून चर्चा होत आहे.


