बीड

महेश मांजरेकर यांची रमेश पोकळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

 महेश मांजरेकर यांची रमेश पोकळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

पुणे प्रतिनिधी – मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते तथा सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी उद्योजक रमेशभाऊ पोकळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिध्द अभिनेते तथा चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी उद्योजक रमेश भाऊ पोकळे यांच्या पुणे येथील निवासस्थानी आवर्जून सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान महेश मांजरेकर आणि रमेश  पोकळे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी महेश मांजरेकर यांनी रमेश पोकळे यांच्या परिवारा बरोबरही अतिशय आपुलकीने कौटुंबिक संवाद साधला. या प्रसंगी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांचे रमेश  पोकळे यांनी स्नेहपूर्वक पुष्पगुच्छ देऊन कौटुंबिक स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी रमेश भाऊ पोकळे यांच्या पत्नी सौ. सारिकाताई पोकळे, मुलगी अंकिता पोकळे, मुलगा ओमराजे पोकळे, पुतण्या अभिषेक पोकळे आदी उपस्थित होते.
Back to top button