जामखेड पोलिसांची धडक कारवाई ; २० वाहनचालकांवर कारवाई, १९,५०० रुपयांचा दंड वसूल!

जामखेड पोलिसांची धडक कारवाई ; २० वाहनचालकांवर कारवाई, १९,५०० रुपयांचा दंड वसूल!
जामखेड प्रतिनिधी –जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील खर्डा चौक येथे दिनांक ८ जुलै २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी करून वाहनचालकांवर धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस नाईक शामसुंदर जाधव, अंमलदार प्रकाश जाधव, सचिन चव्हाण, अमोल आजबे, प्रणव चव्हाण, योगेश दळवी, होमगार्ड रफीक तांबोळी व पवार यांच्या पथकाच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या कारवाईदरम्यान विना परवाना वाहन चालवणे, काळ्या काचा असलेली वाहने, नो पार्किंग, ट्रिपल सीट, एका बाजूला नंबर प्लेट नसणे, मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक यावर कडक कारवाई करत एकूण २० गुन्हे नोंदवून १९,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
*कारवाई*
नो पार्किंग – ४, काळ्या काचा / फ्रेम – ५,ट्रिपल सीट – ९,एका बाजूला नंबर प्लेट नसणे – २,मोबाईलवर बोलणे – १,मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक – १ या कारवाईमुळे नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, जामखेड शहरात व तालुक्यात नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
*चौकट:*
जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी यांनी पदभार स्विकारल्यापासून शहरातील अवैध धंदे यामध्ये मटका, जुगार, गुटखा, मावा यांसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई सुरू आहे. तसेच, शासनाच्या वेळे बाह्य सुरु असलेल्या कलाकेंद्रांवरही कारवाई करत चौधरी यांनी गुन्हेगारांचा श्वास रोखला आहे.पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले की, “गुन्हेगारी हटवणे, अट्टल गुन्हेगारांना तडीपार करणे आणि नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देणे हेच आमचे ध्येय आहे.



