रायगड

साखरपुडा सचिन आणि सायलीचा, चर्चा मात्र गोल्ड मॅनची

साखरपुडा सचिन आणि सायलीचा, चर्चा मात्र गोल्ड मॅनची
उ रा जिल्हा प्रतिनिधी-: नारायण म्हात्रे
पालखार, ता. पेण येथील वयोवृद्ध कमल मोतिराम म्हात्रे वय ८० वर्ष हे चर्चेचा मुद्दा बनले असून, त्याला कारणही तसेच होते पालखार, ता. पेण येथे वरवठणे येथील सामाजिक कार्यकर्ते नथुराम वामन म्हात्रे यांचा सुपुत्र चि. सचिन व गणेश बुधाजी म्हात्रे यांची सुकन्या चि सौ का सायली या उभयतांचा साखरपुडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने हे वयोवृद्ध काका कमल मोतिराम म्हात्रे हे आले होते साधारणतः त्यांना सोन्याची आवड असून त्यांच्या कमरेला करगोटा सुध्दा सोन्याचा आहे व त्यांच्या अंगावर साधारणतः किलोभर सोने आहे, त्यांना हा छंद कसा जडला हे विचारले असता त्यांनी जे कारण सांगितले ते सर्वांना अचंबित करणारे आहे अशा या काकांबरोबर नागोठणे ग्रामपंचायत माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे नेते विलासराव चौलकर, शिवसेना उबाठा पक्षाचे उपविभाग प्रमुख बलिराम बडे, पिगोंडे ग्रामपंचायत सरपंच संतोष कोळी, नागोठणे पत्रकार संघाचे सचिव महेंद्र माने, भाजप जिल्हा नेते किशोर भाई म्हात्रे, रोशन पारांगे अशा महान व्यक्तींनी आपले सेल्फी फोटो काढून घेतले.

Back to top button