१ मे महाराष्ट्र दिनी न्यु इंग्लिश स्कुल नेवरुळ शाळेचे ध्वजारोहण सुशांत लाड यांच्या हस्ते

द. रा. जि. उप संपादक: संतोष उद्धरकर.
म्हसळा: महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या वर्धापन दिन म्हणजे १ मे रोजी महाराष्ट्र व कामगार दिन म्हणुन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो, यावेळी शासकीय, प्रशासकीय, शाळा, कॉलेज, या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते, न्यु इंग्लिश स्कुल नेवरुळ या शाळेचे ध्वजारोहण नेवरूळ गावचे प्रतिष्ठीत नागरीक व सामाजिक कार्यकर्ते सुशांत लाड यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आठवी ते नववी प्रथम, व्दितीय,त्रितीय यशस्वी विद्यार्थी यांना प्रमाणपत्र वितरण करुन त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी सुशांत लाड यांनी शाळेसाठी संरक्षण भिंत बांधुन देण्याचे जाहिर करण्यात आले. या वेळी उपस्थित सुशांत लाड, चेअरमन रविंद्र लाड, सरपंच श्वेताताई लटके, मुख्याध्यापक मिणेकर सर, पोलिस पाटील निलेश लटके, सदस्य स्वप्नील लाड, गाव अध्यक्ष, शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



