संपादकीय

काँग्रेसला बसला मोठा धक्का ! काँग्रेसमधील ‘हे’ तीन मंत्री देणार राजीनामा !

 

नवी दिल्ली | देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाने राजकीय वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे राजस्थानमध्ये वेगळंच वारं वाहत असल्याचं समोर आलं आहे. राजस्थानमध्ये तीन काँग्रेसचे मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. या मंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून तशी इच्छा व्यक्त केली आहे.

राजस्थान सरकारमधील रघू शर्मा, हरिश शर्मा आणि गोविंद सिंह डोटासरा यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसच्या पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा असल्याचंही पत्रात म्हटलं आहे. या पत्रामुळे राजस्थान सरकारमधील गोंधळ सर्वांसमोर आला आहे. आता यानंतर सोनिया गांधी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

या आधीही राजस्थान काँग्रेसमध्ये काहीतरी तणाव असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच या तीन मंत्र्यांनी सोनिया गांधीना लिहीलेल्या पत्रामुळे पक्षातील तणाव सर्वांसमोर आला आहे. दिवाळीआधीच राजस्थान सरकारमध्ये बदल करण्यास सुरुवात झाली होती. त्याचाच हा एक भाग असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

या साऱ्या घडामोडी घडल्यानंतर लगेचच काँग्रेस प्रभारी अजय माकन हे जयपुरला पोहोचले आहेत. त्यामुळे आता राजस्थान सरकारमध्ये लवकरच काहीतरी मोठा घडण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अजूनही काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता नेमकं राजस्थान काँग्रेसमध्ये नेमके कोणते महत्त्वाचे बदल होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Back to top button