संपादकीय

सरकारनं कोरोना काळात फक्त खजाने भरले, आघाडी सरकारवर देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

 

मुंबई | महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन नुकतीच दोन वर्ष झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असताना विरोधकाकडून टीका होत आहे. आता द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासमोर कोरोनाचं संकट उभं होतं पण आम्ही संकटाचं संधीत रुपांतर केलं, असं वक्तव्य केलं.

याच वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देत विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर थेट आरोप केला. फडणवीस म्हणाले, ही कसली संधी? हे सरकार म्हणजे संधीसाधू सरकार आहे. कोरोना संकटातही यांनी तिजोऱ्या भरल्या, असा आरोप त्यांनी केला. एका प्रसिद्ध मराठी माध्यमावर मुलाखत देताना फडणवीस यांनी हा आरोप केला.

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त मुख्यमंत्री म्हणाले, सरकारवर संकट आलं, त्याचं आम्ही संधीत रुपांतर केलं. याविषयी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले, ”ही कोणती संधी आहे हे मला समजलं नाही. कोरोनाच्या काळात देशातील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. 35 टक्के देशातील मृत्यू महाराष्ट्रात आहे.40 टक्के मृत्यू ऱाज्यात आहे. सर्वाधिक अफेक्टेड राज्य महाराष्ट्र आहे. हे सर्व होत असताना शेतकऱ्यांना मदत नाही. बाराबलुतेदारांना नवा पैसा दिला नाही. इतर छोट्या राज्यांनी बलुतेदारांना मदत केली.

राज्य सरकारने एक मदत शेतकऱ्यांना दिले नाही. आमच्या काळात 15 हजार कोटी विम्याचे मिळाले, यांच्या काळात 500 कोटीही मिळाले नाही. त्यामुळे संधीचे रुपांतर कशात रुपांतर हे मला कळत नाही. मला एवढं लक्षात आलं की संकटात काही संधी साधू या सरकारमध्ये होते. त्यांनी संधी साधली आणि आपले खजाने भरले. यापेक्षा काही रुपांतर दिसलं नाही.

Back to top button