📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मिलिंद नगरमध्ये आंबेडकर-फुले जयंती महोत्सवाचे आयोजन

मिलिंद नगरमध्ये आंबेडकर-फुले जयंती महोत्सवाचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी : जामखेड येथील मिलिंद नगर जयंती महोत्सव समितीच्या वतीने दि. १० ते १४ एप्रिल दरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत लाईफ लाईन ब्लड बँक व युनिटी हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदान व सर्व निदान आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता भारतीय बौद्ध महासभा, जामखेड यांच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम व वैज्ञानिक प्रयोग सादरीकरण होणार असून श्रीमती वंदना शिंदे (ठाणे) या मार्गदर्शन करणार आहेत.
दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ग्रामीण विकास केंद्र, जामखेड यांच्या वतीने महिला क्रीडा स्पर्धा होणार आहे.
दि. १४ एप्रिल रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार असून सकाळी ११ ते ४ या वेळेत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सायंकाळी मिलिंद नगर येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम मिलिंद नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे होणार असून नागरिकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Back to top button