बीड

अपघात ग्रस्त महावीर कर्नावट यांचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी वाचवले प्राण

अपघात ग्रस्त महावीर कर्नावट यांचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी वाचवले प्राण
बीड (प्रतिनिधी) :  शहरातील नगर रोडवरील चंपावती कॉम्प्लेक्स मधील श्रीनाथ हॉटेल्स समोर अपघातग्रस्त मोटर सायकल स्वरास सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी वेळीच मदत करत सदर जखमीस शासकीय रुग्णालयात दाखल करून वेळेवर उपचार मिळवून देऊन त्यांचे प्राण वाचवले.         याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नगर रोडवरील चंपावती शाळा कॉम्प्लेक्स मधील हॉटेल श्रीनाथ समोर दि. ३ जानेवारी २०२६ शनिवार रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता महावीर कर्नावट राहणार कोळगाव ता. गेवराई जि. बीड येथील रहिवासी असून त्यांचे वय 40 वर्ष आहे.ते टीव्हीएस मोटरसायकल क्र. एम. एच.२३ए.के.९३८२  ने नगर रोडवरील नगर नाका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या दिशेने जात असताना त्यांनी त्याच दिशेने जाणाऱ्या अज्ञात टू व्हीलरला मागून धडक दिली. ते स्वतःच्या टू व्हीलर वरून रस्त्यावर खाली पडले. हे दृश नगर नाकाच्या दिशेने टू व्हीलर वर जाताना डॉ. संजय तांदळे यांनी पाहिले . सामाजिक  कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे व हॉटेल समोर उभे असलेले बाजीराव चव्हाण, रावसाहेब गुळभिले, सुदाम कोळेकर, सुमूर्ती वाघिरे सह अज्ञात तीन व्यक्तींनी मिळून रस्त्यावर पडलेल्या अपघात ग्रस्त मोटर सायकल स्वरास रस्त्याच्या कडेला घेण्यात आले.त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्या डोक्यावरील जखमेतून रक्ताची धार वाहत होती. कापूस व हातरुमालने जखम बांधून त्यांना रिक्षात टाकून शासकीय रुग्णालयात तातडीने  दाखल करण्यात आले. दवाखान्यात त्यांच्यावर डॉक्टर व नर्स टीमने उत्तम उपचार केले. दुपारी संबंधित पेशंटला भेटण्यासाठी डॉ. संजय तांदळे व सुदाम कोळेकर गेले असता पेशंटची प्रकृती सुधारत असल्याचे दिसून आले. पेशंट समवेत त्यांचे  मोठे बंधू सचिन कर्नावट, नांदूर घाटचे सामाजिक कार्यकर्ते आनंद कोटेचा, जय गुरु गणेश पंचग्रुप बालाघाटचे संस्थापक अध्यक्ष प्रेमचंदजी जवाहरमलजी  बोरा उपस्थित होते. त्यांनी अपघात ग्रस्त महावीर कर्नावटचे प्राण वाचवल्याबद्दल डॉ. संजय तांदळे , बळीराज चव्हाण, सुदाम कोळेकर, रावसाहेब गुळभिले, सुमूर्ती वाघिरे रिक्षा चालक सह मदत केलेल्या सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
Back to top button