बीड

चारधाम यात्रापूर्ती निमित्त दैठण्यात तीन दिवसीय भव्य कीर्तनमहोत्सव

चारधाम यात्रापूर्ती निमित्त दैठण्यात तीन दिवसीय भव्य कीर्तनमहोत्सव

मंत्री पंकजा मुंडे, आ. धनंजय मुंडेंसह दिग्गजांची राहणार उपस्थिती
२२ ते २४ एप्रिल रंगणार सोहळा
परळी – परळी तालुक्यातील दैठणा घाट येथे चारधाम यात्रेनिमित्त भव्य असा मावंद्याचा कार्यक्रम आयोजित केला असून दिनांक २२ एप्रिल ते २४ एप्रिल तीन दिवस भव्य श्री ज्ञानोबाराय चरित्र कथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह इतर दिग्गज मंडळींची उपस्थिती लाभणार आहे.
परळी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या दैठणा घाट या गावातील बालाजी वैजनाथ गुट्टे आणि मंदोदरी बालाजी गुट्टे यांनी चार धाम यात्रा पूर्ण करून आल्याबद्दल भव्य मावंद्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २२ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सकाळी ८ ते १० ह.भ.प. कृष्णा महाराज गुट्टे यांची ज्ञानोबाराय चरित्र कथा, ११ ते १ राम कृष्णहरी जप, २ ते ४ दुपारचे कीर्तन, ८ ते १० रात्रीचे किर्तन, रात्री जागर आणि पहाटे काकडा भजनाचा समावेश असून तिन्ही दिवशी अल्पोपहार तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी म्हणजे २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सौ. सुदामती गुट्टे यांच्या हस्ते कलशपुजन सोहळा होऊन कथेला सुरुवात होईल. त्यानंतर आई-वडील वैजनाथराव गुट्टे आणि अनुसया गुट्टे यांचं मातृपितृ पूजन सोहळा पार पडेल. दुपारी २ ते ४ ह.भ.प. आचार्य अर्जुन महाराज लाड यांचं तर रात्री ८ ते १० ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे कीर्तन होईल. दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी सकाळी कथा, दुपारी २ ते ४ ह.भ.प. जयवंत महाराज बोधले तर रात्री ८ ते १० ह.भ.प. ज्ञानेश्वर (मोठे कदम) माऊली यांचं कीर्तन होईल. तर तिसऱ्या दिवशी २४ एप्रिल रोजी सकाळी कथा झाल्यानंतर मिरवणूक आणि २ ते ४ ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता व त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
या तीन दिवसीय मावंद्याच्या कार्यक्रमाला पहिल्या दिवशी आमदार रत्नाकर गुट्टे, दुसऱ्या दिवशी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, तुकाराम महाराज शास्त्री, प्रभाकर महाराज झोलकर आणि तिसऱ्या दिवशी माजी कृषिमंत्री आमदार धनंजय मुंडे, शिवसेना नेते टी. पी. मुंडे, माजी आमदार संजय दौंड यांच्यासह इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी भेट देणार आहेत. या भव्यदिव्य किर्तन महोत्सवाला पंचक्रोशीतील मंडळींनी उपस्थित राहून शोभा वाढविण्याची विनंती दैठणा घाट येथील गावकरी मंडळी आणि आयोजक बालाजी गुट्टे, मंदोदरी गुट्टे, नितीन गुट्टे, शुभांगी गुट्टे, कृष्णा महाराज गुट्टे, ज्ञानेश्वरी गुट्टे, कु. भक्ती, रेवा, गार्गी आणि समस्त गुट्टे कुटुंबाने केली आहे.
Back to top button