बीड
जय भवानीच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे यश जयभवानीचा विद्यार्थी अशोक बांगर यांची पीएसआय पदी निवड

जय भवानीच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे यश
जयभवानीचा विद्यार्थी अशोक बांगर यांची पीएसआय पदी निवड
महाविद्यालयाच्या वतीने अशोक बांगर यांचा सत्कार
पाटोदा प्रतिनिधी :- दि.२५ मार्च : पाटोदा येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालयात ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवले जाते.त्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला यश मिळाले आहे. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री.अशोक बांगर यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेतलेल्या परीक्षेतून पीएसआय पदी निवड झाली आहे. अशोक बांगर यांची पोलिस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.विश्वास पाहुणे व प्र.प्राचार्य प्रा.सोमनाथ घाडगे यांच्या शुभहस्ते श्री.अशोक डांगर यांचा शाल,श्रीफळ,व पुष्पगुच्छ देवून महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी व्यासपीठावर माजी प्राचार्य डॉ.सुनिल जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.विनोद किर्दक व प्रा. डॉ. बंडू लोखंडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रा. डॉ शिवाजी काकडे यांनी या सत्कार समारंभाचे प्रस्ताविक केले त्यानंतर सत्काराला उत्तर देताना सत्कार मूर्ती पीएसआय श्री अशोक बांगर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रतिकृती परिस्थितीत कसा अभ्यास केला आहे सांगून आत्मविश्वास निवेदन देह आणि चिकाटीने अभ्यास केल्यास यश मिळते असे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. विश्वास कदम यांनी सांगितले की ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयात मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले होते. श्री. अशोक बांगर यांची पीएसआय पदी निवड झाली हे या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे पहिले यश आहे. याची विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी ! असे विद्यार्थ्यांना अहवान केले. या कार्यक्रमाचे बहारदार संचलन प्रा. डॉ.अशोक देवगुडे यांनी केले व आभार प्रा.डॉ.बंडू लोखंडे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
———



