बीड

ऑपरेशन टायगर ऐवजी ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावे:- राजेंद्र आमटे 

ऑपरेशन टायगर ऐवजी ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावे:- राजेंद्र आमटे
खासदार फोडायला पैसे आहेत पण कर्जमाफीला का नाहीत?
चौकट:- अतिवृष्टी मध्ये संपूर्ण जिल्हाचे अतोनात नुकसान झाले तरीही शेतकऱ्यांना पीकविमा का मिळत नाही? तत्काळ मागील वर्षाचा पिक विमा मंजूर करा
बीड ( प्रतिनिधी) कर्जाच्या डोंगरपाई शेतकरी देशोधडीला लागला आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा फसवी केली आहे या फसव्या कर्जमाफी मध्ये शेतकऱ्याच्या पदरात पडणार नाही सरकारने ऑपरेशन टायगर राबवले, ऑपरेशन टी एम सी राबवले, ऑपरेशन आप राबवले, ऑपरेशन एन सी पी राबवले पण सरकारने ऑपरेशन  कर्जमाफी राबवावे सरकारला खासदार फोडायला पैसे आहेत पण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी पैसेच नाही का? सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली
      शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड जिल्ह्यातील बऱ्हाणपूर येथे सरकारच्या फसव्या कर्जमाफी जीआरची होळी करण्यात आली या वेळी शेतकऱ्यांमध्ये फसव्या कर्जमाफी संदर्भात शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जागृती करण्यात आली. शेतकरी हक्क मोर्चा गावो गावी जाऊन सरकारच्या विरोधात फसव्या कर्जमाफी विषयी जागृती अभियान राबवत आहे
      बीड जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी ने धुमाकूळ घातला गावची गाव अतिवृष्टी नुकसान झाले तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा का मिळत नाही? सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा तत्काळ देण्यात यावी अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने राजेंद्र आमटे,काशिनाथ लांडे, अतुल लांडे, मोहन लांडे, बन्सी कानडे, राम चिरके मच्छिंद्र लांडे, नारायण लांडे, नीलेश माने, चंद्रसेन क्षीरसागर, सुरेश लांडे, दादासाहेब लांडे, गोरख शिंदे यांनी केली
Back to top button