बीड

शिक्षक बँकेचा कारभार आदर्शवत – व्हाईस चेअरमन रमेश गोरे

शिक्षक बँकेचा कारभार आदर्शवत – व्हाईस चेअरमन रमेश गोरे

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक,शाखा जामखेडच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

जामखेड प्रतिनिधी;-इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या आठवणींना उजाळा देत गोरे म्हणाले की, सोसायटीत शिवजयंती कार्यक्रमात भाषणासाठी मला एक रुपया बक्षीस मिळाले होते. तो मिळालेला “एक रुपया आजच्या जीवनात प्रेरणा देतो.कौतुकाची थाप कोणाला तरी आनंद देतो.शिक्षक बँक,शाखा जामखेड येथील कार्यालयाच्या बाबतीत अडचणी सोडवण्यासाठी एकत्र आले पाहिजे.त्यासाठी संतोष कुमार राऊत हे तळमळीने काम करत आहेत. शिक्षक बँकेचा कारभार आदर्शवत आहे.असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश गोरे यांनी केले.*

दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक,शाखा जामखेडच्या वतीने कै. दादासाहेब दोंदे व कै.भा. दा.पाटील (गुरूजी) पारितोषिक सन २०२३-२०२४ या वर्षीचा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना संचालक संतोषकुमार राऊत म्हणाले की,सन्मान केल्याने प्रेरणा मिळते.शिक्षकांच्या कौंटुबिक बाबबीत शिक्षक बँकेचा आधार मोठा असून याच माध्यमातून शिक्षकांच्या मुलांचे गुणवत्ता व भवितव्य अवलंबून आहे. छोटासा सत्कार जिवन बदलून टाकतो.विश्वासहर्ता वर शिक्षक बँक चालते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश गोरे हे होते तर प्रमुख पाहुणे पाथर्डी संचालक ज्ञानेश्वर शिरसाट होते. यावेळी केंद्रप्रमुख राज्य सरचिटणीस राम निकम,संचालक संतोष कुमार राऊत,शिक्षक नेते नारायण राऊत, किसनराव वराट, पांडुरंग मोहळकर, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष नानासाहेब मोरे, गोकुळ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष विकास बगाडे, अर्जुन पवार,उत्तम पवार, दत्तात्रय यादव, विनोद सोनवणे,शिवाजी हजारे, काकासाहेब कुमटकर, राजीव मडके,शाखाधिकारी मुकुंद ढवळे, आदर्श शिक्षक बाळासाहेब जरांडे, बाळासाहेब औटे, अजित गोरड, नवनाथ बहिर, अर्जुन घोलप, विकास हजारे आदी शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी , विद्यार्थिनी व शिक्षक यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी केंद्रप्रमुख राम निकम, गोकुळ गायकवाड, नानासाहेब मोरे, नारायण राऊत, किसनराव वराट यांनी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुमार राऊत,सूत्रसंचालन रामहरी बांगर, आभार प्रदर्शन शिवाजी हजारे यांनी मानले.
*गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
औटे आर्या बाळासाहेब (जिल्ह्यात प्रथम – गणित, विज्ञान प्रदर्शन ),उत्कर्षा बाबासाहेव नाकाडे- (एस.एस.सी.)१००%,स्नेहल प्रमोद पिंपरे- (एस.एस.सी. ९१.६७%), सानिया माजीद शेख(एच.एच.सी. ८३.१७%),हर्षवर्धन अमोल गोरे(भारतीय अभिरूची शिष्यवृत्ती परीक्षा (९०.६७%),शौर्य विकास हजारे
नवोदय विदयालय प्रवेश, शौर्य विकास हजारे(सैनिकी स्कुल प्रवेश),प्रज्वल शेखर घुमरे(सैनिकी स्कुल प्रवेश),प्रमोद शिवदास पिंपरे(बी. एस्सी.८२.१०%)
*आदर्श शिक्षकांचे कौतुक*
जरांडे बाळू गंगाराम शाळा- पवारवस्ती (आदर्श शिक्षक परस्कार जिल्हा परिषद अहमदनगर),निकम रामराव माणिकराव केंद्रप्रमुख – पाटोदा(सरचिटणीस केंद्रप्रमुख संघटना महाराष्ट्र राज्य),गायकवाड गोकुळ श्रीरंग शाळा – रलापुर(अखिल भारतीय वडोदा वांङ्मय मराठी साहित्य परिषद पुरस्कार),निमसे सारिका संपतराव, शाळा – पिंपळगांव ऊंडा(महिला व बालविकास अधिकारी),चव्हाण एकनाथ पंढरीनाथ, शाळा बसरवाडी(लेखक – पंच (भाऊ) पुस्तक),औटे बाळासाहेब अंबादास, शाळा,रत्नापुर,(रनिंग फिनिशर १० किमी),कुमटकर गणेश रामदास,बऱ्हाणपुर
(अन्न व सुरक्षा अधिकारी) ,पवार उत्तम अर्जुन शाळा, पाटोदा(ग.),(गंगाई- बाबाजी आदर्श शिक्षक पुरस्कार),जाधव बळीराम पांडुरंग, शाळा,भुतवडा,( राष्ट्रसंत डॉ.रामराव महाराज ,प्रेरणा पुरस्कार),कुमटकर विशाल काकासाहेब(सहाय्यक करनिरीक्षक
महाराष्ट्र राज्य),निगुडे ओंकार सिताराम(एम् बी बी एस साठी निवड, कानपुर),घोलप शिवप्रसाद अर्जुन(एम वी वी एस साठी निवड,चेन्नई),बांगर यश किशोर(एम् बी बी एस, साठी निवड,सांगली),गुळवे मृत्युंजय प्रकाश(एम् बी बी एस साठी निवड
, उन्नव लखनऊ),वाळेकर आदित्य सुधिर(बी.ए. एम् साठी निवड देहराडुन),विधाते सुरज बापूराव( एम् बी बी एस साठी निवड),पियूष राजीव मडके(बी.टेक,डाटा सायन्स साठी निवड), सदाफुले अँजल सतिश (बी.फार्मसी निवड ), वराट प्रतिक किसन(बी.टेक),मोरे मानस नानासाहेब (बी.टेक),स्वराज बापूसाहेब विधाते (बी.टेक) , धनराज पवार ( दैनिक सुर्योदय च्या उपसंपादक पदी निवड)

Back to top button