बीडब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंदडांचा अन्नत्याग अन्‌ एका सुशिक्षित महिला नेतृत्वाची भावना

केज भाजपाच्या आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी कालच्या सोमवारी मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीत सापडलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या लोकांना मदत मिळवुन देण्यासाठी एक दिवस अन्नत्याग उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर केला. स्व.विमलताई मुंदडांचा राजकिय वारसा सक्षमपणे चालवताना मी कितीही शिकलेली लोकप्रतिनिधी असेल पण मला सामान्य जनतेवर जेव्हा संकट येईल अशा वेळी स्वस्थ बसणार तर काय?हे दाखवुन दिले. तब्बल आठ तास कशाचाही घास न घेता पाण्याचा घोट न पिता त्यांनी ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्याचा केलेला प्रयत्न संकटात सापडलेल्या लोकांना दिलासा देण्यासारखा आहे.

महाराष्ट्रात सर्वात अगोदर संघर्षाची लढाई त्यांनी सुरू केली. शेतकऱ्यांच्या बाजुने आवाज उठवुन न्याय मिळवुन देण्याचा त्यांचा प्रयत्न नसे हा थोडका.    वीस वर्षे मतदारसंघाचं नेतृत्व स्व.विमलताई मुंदडा यंानी केलं. सामान्य माणुस केंद्रस्थानी आपल्या आयुष्यात ठेवला आणि मग त्यांच्या कल्याणासाठी राजकारण केलं. हाच वारसा सुनबाई आमदाराच्या भुमिकेतुन सक्षमपणे चालवताना दिसतो आहे. मागच्या पंधरा दिवसापासुन अतिवृष्टीने धुमाकुळ घातला. मांजरा धरण भरलं. अचानक पाणी सोडलं ते का सोडलं?याची चौकशी व्हायला हवी. मात्र आपेगाव, देवळा, सावळेश्र्वर पैठण केज तालुक्यातील अनेक गावाला महापुराचा फटका बसला. सुपिक जमिनी वाहुन गेल्या. जनावरे वाहुन गेली. काही माणसाचे बळी गेले. वीजेचे खांब पडले. कोठे वाहुन गेले. चांगली घरे वाहुन गेली. एकुणच चित्र करोडो रूपायाचं नुकसान मतदारसंघात झालं.

संकट एवढं भयानक होतं गावची गावे पाण्याने वेढली. खरं तर अशा वेळी लोकप्रतिनिधीची भुमिका फार महत्वाची असते. जेष्ठ नेते नंदुशेठ मुंदडा यांना कुठल्याही संकटाचा अनुभव दांडगा असल्याने शिवाय अक्षय मुंदडा यांच्यातली तत्परता स्वत: आ.नमिताताई हे त्रिकुट संकटात रात्रीचा दिवस एक करत लोकांच्या मदतीला धावले. हे केवळ लिहिण्याचा भाग नाही तर प्रत्यक्ष त्या त्या भागात लोकांनी पाहिले. नमिताताई सुशिक्षित महिला नेतृत्व.शहरी संस्कृती पण आम जनतेला संकटात कशा धावुन जातात?आणि मदत करतात ही भुमिका लोकांनी पाहिली. रात्रंदिवस अनेक भागात पडत्या मुसळधार पावसात ही मंडळी फिरली. प्रशासनाला सतत वचक आणि संपर्क ठेवत यंत्रणा हलवली. ज्यात नंदुशेठ यांचा हातखंडा असतो. नुकसानीत मदत करा आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडु नका, हेक्टरी 50 हजार रूपये द्या, विमा तात्काळ मंजुर करा, खरडुन गेलेल्या जमिनी दुरूस्तीला पैसे द्या. आदी मागण्यांसाठी नमिताताईंनी अन्नत्याग करून एक दिवसाचे उपोषण केले.

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दारात तब्बल आठ तासापेक्षा अधिक आमदार आणि मतदारसंघातील पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी व सर्वसामान्य जनतेने सहभागी होवुन त्यांना पाठिंबा दिला. पण एक गोष्ट खरी आहे लोकप्रतिनिधी सुशिक्षित असेल तर खऱ्या अर्थाने दुरदृष्टी त्यांच्यात असते. सरकार गुमानं मदत करत नाही. त्यासाठी संघर्ष हाच पर्याय म्हणुन या संकटात त्यांनी जागता पहारा ठेवत सरकारकडे मदतीचा टाहो फोडण्याचं काम केलं. त्याचं कौतुक मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. विमलताई मुंदडा यांचं राजकारण त्यापेक्षा सुनबाईचा एक पुढे पडलेला पाऊल याचाच अर्थ सक्षम वारसा कसा जपल्या जातो?हे अन्नत्यागातुन दिसुन आलं. माध्यमांनी उपोषणाची चांगली दखल घेतली. सोशल मिडिया, पिं्रट मिडिया यांनी दखल घेत अन्नत्यागाचा उचललेला प्रश्न ज्याची दखल आता ठाकरे सरकारला निश्चित घ्यावी लागणार यात तिळमात्र शंका नाही.

Back to top button