बीडब्रेकिंगमहाराष्ट्र

परिसराबरोबरच मनाचीही स्वच्छता आवश्यक – प्रा.डॉ.बाबासाहेब ठोंबरे

कृषि महाविद्यालयामधे स्वच्छ भारत अभियानाचे सहावे पुष्प संपन्न


अंबाजोगाई (प्रतिनिधी):-

‘स्वच्छ भारत अभियान’ हे भारत सरकार द्वारे ०१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार एक देशव्यापी अभियान आहे. या अभियानांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या निर्देशानुसार,येथील कृषि महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ०१ ऑक्टोबर पासून ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचे आज दि. ०६ ऑक्टोबर रोजी सहावे पुष्प गुंफण्यात आले.यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता,प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध गझलकार डॉ. मुकुंद राजपंखे,पत्रकार देविदास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्‍या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून व संचालक शिक्षण यांच्या मार्गदर्शनानुसार हरित, स्वच्छ, सुंदर व सुरक्षित परिसर या उद्देशातून श्रमदानाद्वारे ‘स्वच्छ भारत’ अभियान राबविण्यात येत आहे.


या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. मुकुंद राजपंखे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आज लोप पावत चाललेली नीतिमूल्य, श्रमसंस्कार, समाजभान व नातेसंबंध जपले पाहिजे. आपल्या भोवतालाची स्वच्छता व्हायला हवीच,मात्र त्याचबरोबर आपल्या ज्ञानेंद्रियांची सुद्धा स्वच्छता झाली पाहिजे.जेणेकरून आपली आकलन व ग्रहणक्षमता वाढीस लागेल.आपले इंद्रिय निकोप, निर्मळ आणि शुद्ध तेच ग्रहण करतील. त्यांनी संवाद करत असताना समयोचित कविताही त्यांनी यावेळी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्याचबरोर पत्रकार देविदास जाधव यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.अशा अभियानातून खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडत असतात. त्यांचे व्यक्तिमत्व विकास सांघीक कार्य करण्याची वृत्ती वाढीस लागते. व सजग समाजभान जागृत होत असते. यातूनच लोकशाही मुल्य मजबूत होण्यास मदत होते असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चव्हाण यांनी मागील कार्याचा आढावा घेऊन, पुढील कार्याची दिशा विशद केली.


अध्यक्षीय समारोपाप्रसंगी डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, कोरोणा सारख्या जागतिक महामारीच्या काळात स्वच्छतेची गरज ओळखून आपण आपले घर, परिसर व प्रभाग प्रत्येकाने स्वधर्म समजून स्वच्छ ठेवायला हवा. ही विषारी हवा शुद्ध करण्याच्या दृष्टीने आपण प्रत्येकानेच प्रयत्नशील असायला हवे. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या परिसरा सोबतच आपल्या मनाची स्वच्छता करणे गरजेचे असते. आपल्या शेतातील पिकास हानिकारक असलेले तण जसे आपण उपटून टाकतो तसे आपल्या मनातील विकाराचे तणही उपटून टाकायला हवे. आणि ती काळाची गरज आहे.असे या वेळी बोलताना त्यांनी सागितले.या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून परिसरही स्वच्छ केला.सदरील कार्यक्रमांचे प्रास्ताविक जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ. प्रताप नाळवंडीकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय राठोड यांनी केले तर आभार डॉ. योगेश वाघमारे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रवींद्र चव्हाण, डॉ. मोहन धुप्पे, डॉ. सुहास जाधव, डॉ. विद्या तायडे, डॉ. अजित पुरी,अनंत मुंढे, अनिल खेडेकर, यादव पाटील, बालासाहेब चिल्लरगे, स्वप्निल शिल्लार, पुजा वावरगीरे, राजेश रेवले, प्रकाश मुजमुले, नंदकिशोर मोरे , स्वप्निल काळे, वैभव भालेराव, अंकीता भोसले, वैष्णवी बरुरे आदींनी परिश्रम घेतले.

Back to top button