डाक विभागातील वैष्णवी बहिर व गोरख राजगुरू यांचा गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने गौरव

डाक विभागातील वैष्णवी बहिर व गोरख राजगुरू यांचा गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने गौरव
जामखेड प्रतिनिधी – भारतीय डाक विभागाच्या कर्जत उपविभागात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाचे अध्यक्षस्थान मा. एस.डी.आय. तांबे यांनी भूषवले होते. यावेळी पंडित सर व कात्रजकर सर देखील उपस्थित होते.
PLI/RPLI विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पाटोदा बीओच्या बीपीएम वैष्णवी पोपट बहिर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तर गोरख तुळशीराम राजगुरु (एपीबीएम), पाटोदा यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
बहीर व राजगुरू यांच्या या यशाबद्दल दिनांक २६ मे २०२५ रोजी गरडाचे पाटोदा (ता. जामखेड) येथे माजी सरपंच गफ्फार भाई पठाण यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच गफ्फार भाई पठाण, भैय्यासाहेब थोरात, मच्छिंद्र लंघे, प्रा. अनिल थोरात, गौतम मोरे, परमेश्वर मोरे, शहाजी लंघे, इलियास पठाण, मुजाहिद पठाण, शौकत शेख, विष्णू भवर, सुखदेव शिकारे, सोमनाथ सोनवणे, पंडित मोरे, गणपत मोरे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



