📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पोलीस दलातील अधिकार्‍याची दर्या दिली

पोलीस दलातील अधिकार्‍याची दर्या दिली

चिखलमय जामखेड बस स्थानकाची दयनीय अवस्था ,पोलीस निरीक्षकांनी उचलली जबाबदारी ; प्रवाशांना मोठा दिलासा

जामखेड (प्रतिनिधी) —पावसाच्या सततच्या सरींमुळे जामखेड शहरात अनेक भागांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. विशेषतः बसस्थानक परिसरात साचलेल्या चिखलामुळे प्रवाशांना उभं राहणं किंवा चालणंही कठीण झालं आहे. या परिस्थितीकडे एस.टी. प्रशासन आणि बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

या दयनीय अवस्थेकडे कोणीही लक्ष देत नसताना, जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. महेश पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत बसस्थानक परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आगारप्रमुख प्रमोद जगताप आणि बांधकामाचा ठेका घेतलेल्या गुरुदत्त कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून परिस्थितीची गंभीरता समजावून सांगितली.

पाटील यांनी दिलेल्या स्पष्ट सूचना आणि पाठपुराव्यामुळे अवघ्या काही तासांत मुरूम टाकण्याचे काम सुरू झाले. त्यांनी दोन दिवसांत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

सामाजिक जाणिवेतून उचललेले हे पाऊल सर्वसामान्य प्रवाशांसाठी दिलासादायक ठरले आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून बसस्थानकाचे अपूर्ण आणि संथगतीने सुरू असलेले काम, तसेच छत नसल्यामुळे पावसात उघड्यावर बसची वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर येत होती. यासंबंधी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन गप्प होते.

पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या तात्काळ कारवाईमुळे प्रवाशांना चिखल व गैरसोयीपासून काहीसा दिलासा मिळाला असून, नागरिकांकडून त्यांचे कौतुक आणि आभार व्यक्त केले जात आहेत.

Back to top button