महाराष्ट्र

‘अमित शाह काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय साजरा’

 

मुंबई | ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानच्या संघानं १० गडी राखून विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताला प्रथमच नमवलं. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात जल्लोष साजरा झाला. तसेच भारताचा भाग असलेल्या काश्मीर मध्येही पाकिस्तान जिंकल्याचा आनंद साजरा करण्यात आल होता.

आता याच मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून थेट गृहमंत्री अमित शहा यांच्यावर काश्मीरमध्येही पाकिस्तानचा विजय साजरा करण्यात आल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडिओदेखील ट्विट केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काश्मीरमध्ये असताना टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या विजयाचा आणि भारताच्या पराभवाचा जल्लोष साजरा होतो.

ते पुढे म्हणतात की, हिंदुस्तानाविरोधात घोषणाबाजी होते, ही बाब चिंताजनक आहे. केंद्र सरकारनं या घटनेची नोंद गांभीर्यानं घ्यायला हवी, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रस्त्यावर सुरू असलेला जल्लोष दिसत आहे. काही जण हातात झेंडे घेऊन नाचत असून काही जण फटाके फोडून आनंद साजरा करत आहेत.

Back to top button