📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गृह रक्षक दल कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

गृह रक्षक दल कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
केज : प्रतिनिधी
केज येथील गृह रक्षक दलाच्या तालुका कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा समादेशक समीर शेख साहेब व केंद्र प्रमुख झवेरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात तालुका समादेशक राऊत दिनकर पांडुरंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी गृह रक्षक दलाचे सुमारे १०० ते १५० पुरुष व महिला जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थित जवानांनी देशसेवेची भावना अधिक दृढ केली.
कार्यक्रमास ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, केज केंद्राच्या केंद्रप्रमुख मधु दीदी यांची विशेष उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर मधु दीदी यांनी गृह रक्षक दलाच्या जवानांना नशामुक्त भारत अभियानाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. व्यसनांपासून दूर राहून निरोगी, मूल्यनिष्ठ आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित जवानांनी “नशामुक्त भारत” निर्माण करण्यासाठी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याची, कुटुंबीय व समाजाला व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करण्याची तसेच आपल्या वेळ, ऊर्जा व क्षमतेचा सदुपयोग करण्याची शपथ घेतली.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गृह रक्षक दलाच्या जवानांमध्ये उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले. देशसेवा, सामाजिक बांधिलकी आणि नशामुक्त समाजनिर्मितीचा संकल्प या कार्यक्रमातून करण्यात आला.
Back to top button