बीड

सेवानिवृत्त ग्रामसेवक नामदेव कदम यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन.

सेवानिवृत्त ग्रामसेवक नामदेव कदम यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन.

पिंपळवंडी दि.२८(प्रतिनिधी)
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील रहिवाशी सेवानिवृत्त ग्रामसेवक नामदेव मारुती कदम वय वर्ष ८६ यांचे वृद्धपकाळाने दि.२७/०१/२०२६ मंगळवार रोजी सकाळी दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने अंमळनेर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांचा स्वभाव शांत, संयमी होता ते सर्वांशी मिळून मिसळून वागत असत. ते धार्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्त्व होते, त्यांचा अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रामध्ये नेहमी सहभाग असायचा. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार रोजी दुपारी ४:०० वाजता त्यांच्या शेतामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हभप प्रेमानंद शास्त्री महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य गो.गो. मिसाळ सर, माऊली आप्पा जरांगे, परिसरातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, चेअरमन, पत्रकार, ग्रामसेवक तसेच खंडेश्वर विद्यालय कुसळंब येथिल प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद, गाव व परिसरातील, सर्व क्षेत्रातील नागरिक, अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, व्यापारी, वारकरी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा कैलास कदम, विवाहित ४ मुली, सून, जावई, पुतणे, नातवंड असा परिवार आहे. कदम परिवाराच्या दुःखात दैनिक सूर्योदय परिवार सहभागी आहे.

Back to top button