बीड

जनावरांची 50 मुंडके सापडल्याने बीडमध्ये खळबळ मनसेकडून पोलीसांकडे तक्रार

जनावरांची 50 मुंडके सापडल्याने बीडमध्ये खळबळ
मनसेकडून पोलीसांकडे तक्रार
जनावराची कत्तल करणार्‍यांवर कारवाई करावी-सोमेश्वर कदम
बीड (प्रतिनिधी)-बीड शहराजवळील पिंपरगव्हाण रोड,करपरा नदीपात्रा नजिक जनावरांची जवळपास 50 च्या वर मुंडकी व जनावरांची कातडी सापडल्याने खळबळ उडाली असून बीड मध्ये गोहत्या होत असल्याचा पुरावाच मिळाला आहे.
याबाबत माहिती अशी की, बीड शहरातील शाहूनगर भागातील करपरा नदी जवळ झाडाझुडपामध्ये जनावरांची जवळपास 50 च्या वर मुंडके व काही जनावरांची कातडी असल्याची माहिती मनसेचे जिल्हा सचिव प्रमुख सोमेश्वर कदम यांना मिळाली  असता तत्काळ करपा नदीपात्राजवळ जाऊन याची खात्री करून याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना देण्यात जनावरांची मुंडकी सापडल्याने जनावरांची कत्तल करून मुंडके सिमेंटच्या गोण्यामध्ये भरून करपरा नदी जवळ टाकण्यात आल्याने गोरक्षका मध्ये संताप व्यक्त होत असून, जनावरांची कत्तल करून धड(मुंडके) उघड्यावर फेकणारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे सोमेश्वर कदम यांनी केली आहे.
चार दिवसापूर्वी बकरी ईद सण असल्याने बकर्‍यासह इतर जनावरारे कत्तलसाठी बीड शहरात येणार असल्याने बीड पोलीस प्रशासन सतर्क असल्याने मागील आठवड्यात डीवायएसपी पूजा पवार यांनी बार्शी नाका भागात एका वाहनांमध्ये कत्तलसाठी जनावरे येणारा असल्याची माहिती मिळताच ते वाहन जप्त करण्यात आले.तसेच बकरीईद च्या पूर्वसंध्येला मोहम्मदिया कॉलनी एका शेडमध्ये कत्तलसाठी गाई ठेवल्या असल्याची माहिती बीड एसपी पथक व पेठ बीड पोलिसांना मिळाले असता तत्काळ सदरील ठिकाणी जाऊन पोलिसांनी छापा मारून 17 गायींची सुटका केली होती.
राज्य सरकारने गोहत्या बंदी कायदा केला असला तरी बीड शहरात मात्र राजरोस जनावराची कत्तल केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे गोहत्या बंदी फक्त नावाचा आहे का?असा सवाल गोरक्षकांनी केला आहे.

Back to top button