बीड

जि.प. प्राथ.शाळा, मराठी मुली यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जि.प. प्राथ.शाळा, मराठी मुली यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

शिक्षणासोबत कलागुणांचा विकास महत्त्वाचा – गटविकास अधिकारी शुभम जाधव

[जामखेड प्रतिनिधी], [२६] –”शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे आवश्यक असून शिक्षणासोबत कलागुणांचा विकास महत्त्वाचा आहे.अशा उपक्रमामुळे विद्यार्थी भविष्यात अधिक जबाबदारीने समाजात योगदान देऊ शकतात.असे प्रतिपादन गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी केले.
शहरातील मध्यवर्ती असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मराठी मुली यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती चे गटविकास अधिकारी शुभम जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गणेश माळी व मुख्याधिकारी अजय साळवे हे होते.
यावेळी तहसीलदार गणेश माळी व मुख्याधिकारी अजय साळवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी विस्तार अधिकारी कैलास खैरे,केंद्र प्रमुख नवनाथ बडे,राम निकम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा.डाॅ.शिवाजीराव राळेभात, उपाध्यक्ष निलेश गायकवाड,विश्वस्त मंडळाचे मुकुंदराज सातपुते ,लेखक एकनाथ चव्हाण, गोकुळ गायकवाड,शिक्षक नेते किसन वराट, नारायण राऊत ,संजय कर्डिले,नानासाहेब मोरे, नवनाथ बहिर,प्रभाकर बिरंगळ,नगरसेवक दिगांबर चव्हाण,आदर्श शिक्षक बाळासाहेब जरांडे,
ॲड.आरबाज सय्यद,आतिश पारवे,माजीद शेख, विनोद सोनवणे, उध्दव हुलगुंडे,नितीन शिंदे,सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद, धनराज पवार,दादासाहेब कदम,गणेश चव्हाण, अभिमान घोडेस्वार ,अरूण मुरूमकर ,महेश मोरे ,प्रशांत कुंभार, सुनील भामुद्रे आदी पालक,शिक्षक, विद्यार्थिनी व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थिनींनी नृत्य, गाणी, नाट्य प्रयोग आणि देशभक्तीपर गीतांद्वारे उपस्थितांचे मन जिंकले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, गुरुमाऊली, सदिच्छा मंडळ जामखेड यांच्या वतीने प्राथमिक मराठी शाळा,मुली शाळेस पंच भाऊ’पुस्तकाचे सांस्कृतिक कार्यक्रम निमित्त ५ प्रत भेट त्याच बरोबर टिचर वकील, डॉक्टर,हाॅलीबाॅल टिम जामखेड यांच्या वतीने ११०० रुपयांचे विशेष योगदान या कार्यक्रमाप्रसंगी रजनीकांत साखरे यांना साहित्य गौरव पुरस्काराबद्दल सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रय यादव यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला आणि भविष्यातही अशा उपक्रमांना चालना देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यापिका शैलजा बडे, अर्चना भोसले,निशा कदम,खेडकर मॅडम, सिध्देश्वर मॅडम, कानडे ,मॅडम, क्षिरसागर मॅडम,झोरे मॅडम, ढोबळे पाटील मॅडम, पवार मॅडम,डिसले मॅडम, म्हेत्रे मॅडम,मोरे मॅडम, धाऊड मॅडम, साबळे मॅडम,साळे मॅडम,पोले मॅडम,कवडे मॅडम,नितीन मोहळकर, शिरिष कदम यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर माकुडे यांनी केले तर आभारप्रदर्शन अंबादास जोगदंड यांनी मानले.

Back to top button