संपादकीय

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाची लगबग सुरू हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

 

मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. रिपोर्ट्सनुसार या लग्नाला जाणाऱ्या पाहुण्यांची यादीही समोर आली आहे. मात्र, या यादीमध्ये सलमान-शाहरुख या जवळच्याच व्यक्तींची नावे वगळले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

विकी कौशल आणि कतरीना कैफ येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कतरीना आणि विकी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील नामांकित रिसॉर्टमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला येणार्‍या पाहुण्यांच्या नावाची चर्चाही रंगली आहे. या लग्नात जवळपास २०० पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या लग्नाच्या संगीत सेरेमनी आणि मेहंदी सोहळ्याशी संबंधित अनेक बातम्या चर्चेत येत आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, बॉलिवूड दिग्दर्शक शशांक खेतान, जोया अख्तर, प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान, ही कलाकार मंडळींना विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाचं आमंत्रण आलं आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडचा किंग खान आणि भाईजान सलमान खान यांना अजुनही त्यांच्या लग्नाचे आमंत्रण मिळालेले नाही.

Back to top button